शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

महाराष्ट्रात सुमारे ६४ टक्के मतदान

By admin | Updated: October 15, 2014 20:49 IST

राज्यात बुधवारी पार पडलेल्या मतदानात ८ कोटी ३५ लाख मतदारांपैकी सुमारे ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १५ - राज्यात बुधवारी पार पडलेल्या मतदानात ८ कोटी ३५ लाख मतदारांपैकी सुमारे ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. रात्री उशीरापर्यंत मतदानाचा नेमका आकडा समोर येईल असेही अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 
विधानसभेतील २८८ जागांसाठी बुधवारी सकाळी सात वाजता कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानाला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र दुपारनंतर राज्यात सर्वत्र मतदानाची टक्का वाढला. संध्याकाळी पाचपर्यंत ५४.५ टक्के मतदान झाले असून सहापर्यंतची माहिती समोर आल्यावर हा आकडा ६४ टक्क्यांपर्यंत जाईल असे अधिका-यांनी सांगितले. किरकोळ अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. नागपूर, वर्धा आणि मुंबईतील शिवडी येथे व्होटींग मशिनविषयी तक्रारी आल्याचे अधिका-यांनी सांगितले.तर नाशिकमध्येही मतदार यादीत गोंधळ असल्याची तक्रार मतदार करत होते. 
 
नक्षलींचा गोळीबार
गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी मतदानानंतर परतणा-या पोलिंग पार्टीवर गोळीबार केला. पोलिंग पार्टींतील सुरक्ष दलाच्या जवानांनीही या नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत कोणीही जखमी झालेले नाही.  
 
मतदार यादीत नाव नसल्याने मशिन फोडले
 
सातारा येथील पाटण तालुक्यातील भुरकेवाडी येथे एका कार्यकर्त्याने मतदार यादीत नाव नसल्याने व्होटींग मशिन जमिनीवर आदळून फोडले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले तसेच केंद्रात नवीन मशिनही बसवण्यात आले.
 
विदर्भात मुसळधार पाऊस 
 
विदर्भात मुसळधार पावसामुळे मतदानावर परिणाम झाला असून रामटेक येथे मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. वनेर येथे पारशिवनीत आवडेघाटातील एका मतदान केंद्रावर वीज कोसळल्याने एक पोलीस ठार झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
 
सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क
 
सर्वसामान्य जनतेप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनीही बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदार यादीत नाव नसल्याने गुणी अभिनेता अतुल कुलकर्णीला लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी त्याने बुधवारी सकाळीच मुंबईत मतदान केले. तर अभिनेता अभिषेक बच्चनने त्याची आई जया बच्चनसह मतदान केले. अभिनेत्री रेखानेही सकाळी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. तर सचिन तेंडुलकरनेही पत्नीनीसह मतदान करत मतदारांना आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले. शाहरुख खान, रणबीर कपूर, सलमान खान, आमीर खानची पत्नी किरण राव, किरण खेर, अनुपम खेर आदी मंडळींनी मतदान केली आहे. मतदारांनी आवर्जून मतदान करावे असे आवाहन सेलिब्रीटींनी केले आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मतदानाचा हक्क बजावला.