एनडीएची घोडदौड सुरू : सत्यपाल सिंग विजयी
By Admin | Updated: May 16, 2014 09:32 IST2014-05-16T09:32:49+5:302014-05-16T09:32:49+5:30
एग्झिट पोलने वर्तविलेले भाकित खरे ठरण्याची शक्यता असून पहिल्या आणि दुस-या फेरीत भाजपाची घोडदौड सुरू झाली आहे.

एनडीएची घोडदौड सुरू : सत्यपाल सिंग विजयी
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १६ एग्झिट पोलने वर्तविलेले भाकित खरे ठरण्याची शक्यता असून पहिल्या आणि दुस-या फेरीत भाजपाची घोडदौड सुरू झाली आहे.
देशातील पहिला विजय हा एनडीएच्या बाजुने लागला असून भाजपाचे उमेदवार सत्यपाल सिंग हे बागपतमधून विजयी झाले आहेत. सत्यपाल सिंग हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेले आहे. निवृत्तीला एक वर्षाचा कालावधी राहिलेला असताना त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा राजीनामा देत भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. अजित सिंह हे राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष असून ते युपीएच्या मंत्रीमंडळात हवाई वाहतूक मंत्री होते. सत्यपाल सिंग यांनी अजित सिंह यांचा दणदणीत पराभव करीत भाजपाचे विजयाचे खाते खोलून दिले आहे.