राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

By Admin | Updated: October 8, 2016 01:23 IST2016-10-08T01:23:42+5:302016-10-08T01:23:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश बारकू पाटील (६४) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी निधन झाले.

NCP's Vice Chairman Suresh Patil passed away | राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष सुरेश बारकू पाटील (६४) यांचे हृदयविकाराने शुक्रवारी निधन झाले. मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते.
मुलुंड पश्चिमेकडील लोक एव्हरेस्ट इमारतीमध्ये पाटील हे कुटुंबीयांसोबत राहायचे. १९७५मध्ये त्यांनी युथ काँग्रेसमार्फत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर १९७५-८०दरम्यान ते मुलुंड युवक काँग्रेस अध्यक्षपदी होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातून त्यांनी १९८५मध्ये महापालिका निवडणूक लढविली. सलग दोन वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून कार्यभार सांभाळला. १९९५मध्ये त्यांनी बेस्टचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर त्यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी पत्नी मीनाक्षी पाटील यांना दोन वेळा निवडून आणले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्याही मीनाक्षी पाटील या नगरसेविका आहेत. तर पाटील हे मुंबई राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी कार्यरत होते. घरात पुन्हा निवडणुकीसाठी तयारी सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's Vice Chairman Suresh Patil passed away