भाजपाच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
By Admin | Updated: February 16, 2017 16:46 IST2017-02-16T16:46:08+5:302017-02-16T16:46:39+5:30
भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला असून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.

भाजपाच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - भारतीय जनता पार्टीच्या जाहिरातबाजीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला असून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाणार आहे.
काही वर्तमानपत्रामधून एका कोपऱ्यात भाजपाची जाहीरात येते, या जाहिराती कायद्याचे उल्लंघन करत आहेत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजपा सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेने त्यांचा पाठिंबा काढावा.आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही. तसेच, आम्ही मध्यावधी निवडणुकीला तयार आहोत, असेही नवाब मलिक म्हणाले. याचबरोबर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रावर भाजपाची बंदीची मागणी म्हणजे एकप्रकारची लोकशाहीची हत्या असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी यावेळी भाजपावर केली.