शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विधानसभेच्या तयारीत तर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:26 IST

लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

अतुल कुलकर्णी मुंबई : लोकसभा निवडणुकांचे मतदान पार पडताच निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काँग्रेसमध्ये मात्र विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावरच निर्णय होत नसल्याचे समजते.कोणते मतदारसंघ पक्षाला पूरक आहेत, मित्रपक्षांना कुठे सामावून घ्यावे लागेल, कोणत्या जागांची अदलाबदल गरजेची आहे याची स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्या, अशा सूचना पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली. काँग्रेसशीही आमच्या चर्चा लवकरच सुरू होतील, असे ते म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र लोकसभेच्या निकालानंतर प्रदेशाध्यक्ष बदलेल का, विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळेल, याचीच चर्चा आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. हर्षवर्धन पाटील यांचेही नाव चर्चेत आहे.संगमनेर येथे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्याप्रमाणे थोरात यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढत स्वत: ट्विट केले त्यावरून त्यांनी पक्षात योग्य तो संदेश दिला आहे. पक्षश्रेष्ठी एखाद्या जिल्ह्यात मुक्काम करतात तेव्हा त्यांच्यासह प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाचे प्रभारी यांच्यापैकी एक असतो. मात्र संगमनेरात दोघेही नव्हते.

विधानसभेसाठी कोणी पुढाकार घ्यायचा यावर श्रेष्ठींनी संकेत दिलेले नाहीत. निकालानंतर पक्ष पातळीवर बदल होतील, त्यानंतरच पुढील सूत्रे हलतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले. दुष्काळाचा विषय असो की अन्य कोणता, आम्हाला अमूक ठिकाणी जा, पाहणी करा, अशा सूचना अद्याप कोणी दिलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले. निर्णय उशिरा घेण्याने झालेले नुकसान माहिती असूनही निर्णय होत नाहीत, अशी खंतही व्यक्त केली. राधाकृष्ण विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप विधानसभा अध्यक्षांकडे तो पोहोचलाच नाही, मग तो राजीनामा कसा, अशी टिप्पणीही त्या नेत्याने केली.

विखेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीरविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली आहे. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याविषयी पक्षातले आमदार, मंत्री नाखूश आहेत. हे जर पक्षात आले तर जिल्ह्यातील आमचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशा तक्रारी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. काँग्रेसनेदेखील त्यांचे परतीचे मार्ग बंद करून टाकले आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019NCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस