...म्हणून मुंबईत राष्ट्रवादी कमी पडते - शरद पवार

By Admin | Updated: February 14, 2017 18:28 IST2017-02-14T18:27:30+5:302017-02-14T18:28:06+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष शहरापेक्षा ग्रामीण भागावर जास्त असते. मी नेत्यांना शहराकडे लक्ष देण्याच्या सूचना करतो.

... NCP's lacking in Mumbai - Sharad Pawar | ...म्हणून मुंबईत राष्ट्रवादी कमी पडते - शरद पवार

...म्हणून मुंबईत राष्ट्रवादी कमी पडते - शरद पवार

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 14 - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुद्दे, विचार मराठी माणसाशी निगडीत आहेत. पण मुंबईमध्ये शिवसेनेने मराठी माणसाशी संबंधित मुद्यांची स्पेस व्यापल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईमध्ये म्हणावा तसा जम बसवता आलेले नाही अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत दिली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष शहरापेक्षा ग्रामीण भागावर जास्त असते. मी नेत्यांना शहराकडे लक्ष देण्याच्या सूचना करतो पण त्यांचा कल ग्रामीण भागाकडे जास्त आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईसारख्या शहरात अपेक्षित यश मिळत नाही असे शरद पवार म्हणाले. 
 
येणा-या काळात शहरीकरण वाढणार आहे त्यामुळे राष्ट्रवादीने शहरी प्रश्नांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे असे शरद पवारांनी सांगितले. 

Web Title: ... NCP's lacking in Mumbai - Sharad Pawar