राष्ट्रवादी देणार ‘बळीराजाची सनद’

By Admin | Updated: June 10, 2017 03:16 IST2017-06-10T03:16:09+5:302017-06-10T03:16:09+5:30

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू करा अशा मागण्यांची ‘बळीराजाची सनद’ राष्ट्रवादी

NCP's 'Biliraja Charter' | राष्ट्रवादी देणार ‘बळीराजाची सनद’

राष्ट्रवादी देणार ‘बळीराजाची सनद’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन समितीच्या शिफारसी लागू करा अशा मागण्यांची ‘बळीराजाची सनद’ राष्ट्रवादी काँग्रेसने काढली असून पक्षाच्या वर्धापन दिनी ती सरकारला सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१० जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. या वर्षात बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमकपणे संघर्षाची भूमिका घेणार आहे. वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्लीत पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे. तर मुंबईत राज्याच्या मुख्य सचिवांना ‘बळीराजाची सनद’ दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ५ आत्महत्याग्रस्त कुटूबांतील शालेय मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी राष्ट्रवादी घेणार आहे.

Web Title: NCP's 'Biliraja Charter'