शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पात्रता असती तर आज ४३ आमदार सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असते; अजित पवार गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 17:52 IST

देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत असं उमेश पाटील यांनी म्हटलं.

मुंबई - सुप्रिया सुळेंना सुरुवातीला राज्यसभेची संधी कार्यकर्त्यांमुळे निवडून आलेल्या आमदारांमधून दिली गेली. त्यानंतर महाराष्ट्राला सुप्रिया सुळेंचं कर्तृत्व आणि पात्रता कळाली. जर त्यांच्यात एवढी पात्रता असती तर आज जे ५३ पैकी ४३ आमदार अजित पवारांच्या पाठिशी उभे राहिले तेच आज सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे राहिले असते अशा शब्दात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शरद पवार गटावर बोचरी टीका केली. 

शरद पवारांनी एका सभेत बोलताना पात्रता असूनही सुप्रिया सुळेंवर अन्याय केला आणि कार्यकर्त्यांना संधी दिली असं विधान केले. त्यावर उमेश पाटील यांनी ही टीका केली आहे. उमेश पाटील पुढे म्हणाले की, वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. सिंह हा कन्या राशीत अनेक वर्षापासून झुकलेला होता. तो कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत गेला. त्यामुळे हा गृहदोष निर्माण झाला. शरद पवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. आमची अक्कल पात्रता अजिबात नाही. पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनातलं बोलतो. सुप्रिया सुळेंमध्ये कर्तृत्व नक्कीच आहे. त्या संसदपटू, संसदरत्न आहेत. हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व आहे. मग दिल्लीत पक्षाचा एखादा नगरसेवक किंवा आमदार का निवडून आला नाही असा सवाल त्यांनी विचारला. 

त्याचसोबत देशाच्या इतर राज्यामध्ये आमचा राष्ट्रीय पक्ष असताना इतर ठिकाणी आमचे आमदार, खासदार का निवडून आले नाहीत. आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर अनेक राज्यात का पसरला नाही. सुप्रिया सुळेंमध्ये हिंदी, इंग्रजीचं प्रभुत्व होते मग त्यांनी देशभरात इतर राज्यात फिरून पक्ष का वाढवला नाही. जर तसा पक्ष वाढवला असता. १००-२०० आमदार, खासदार त्यांच्या माध्यमातून  निवडून आले असते तर निश्चितपणे त्यांच्यामधील गुणवत्ता, पात्रता प्रमाणित झाली असती. आज ५३ पैकी ९०-९५ टक्के आमदार अजित पवारांच्या पाठिशी आहेत. लोकशाहीत ज्याच्यामागे आमदार, खासदार असतात तोच नेता असतो. त्यामुळे ही वस्तूस्थिती लक्षात घ्यावी. कुणाच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही असंही उमेश पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस