राष्ट्रवादीचे २७ जिल्हाध्यक्ष बदलले
By Admin | Updated: May 30, 2015 01:17 IST2015-05-30T01:17:34+5:302015-05-30T01:17:34+5:30
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले
राष्ट्रवादीचे २७ जिल्हाध्यक्ष बदलले
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत मोठ्याप्रमाणात बदल करण्यात आले असून तब्बल २७ जिल्हाध्यक्ष बदलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीत संजीव नाईक यांच्यासह आ. हसन मुश्रीम, रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उपाध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.
कार्यकारिणी अशी- जिल्हाध्यक्ष : व्हिक्टर फ्रान्सीस डान्टस - सिंधुदूर्ग, प्रसाद रेगे - (कार्याध्यक्ष), सिंधुदूर्ग, शेखर निकम - रत्नागिरी, वसंत ओसवाल - रायगड, अनंत सुतार - नवी मुंबई, मोहन पाटील - मिरा भार्इंदर, सुनील भुसारा - पालघर, जालिंदर कामठे - पुणे ग्रामीण, संजोग वाघेरे पाटील - पिंपरी चिंचवड, सुनील गुलाबराव माने - सातारा, संजय बजाज - सांगली शहर, आ. दिपक आबा साळुंखे - सोलापूर ग्रामीण, राजेश लाटकर - कोल्हापूर शहर, ए.वाय. पाटील - कोल्हापूर ग्रामीण, आ. जयंतराव जाधव - नाशिक शहर, रविंद्र पगार - नाशिक ग्रामीण, विष्णूपंत म्हैसधुणे - (कार्याध्यक्ष), शिवाजीराव पवार-धुळे, नवाब मिर्झा (कार्याध्यक्ष-धुळे), परेश दिलीप कोल्हे - जळगाव शहर, आ. सतीश पाटील - जळगाव ग्रामीण, निसार देशमुख - जालना, मुनीर पटेल - हिंगोली, आ. राणा जगजितसिंह पाटील - उस्मानाबाद, मकरंद सावे - लातूर शहर, बाबासाहेब पाटील - लातूर ग्रामीण, नाझीर हुसेन काझी - बुलडाणा, मधुकर कुकडे - भंडारा, विनोद हरिणखेडे - गोंदिया.
उपाध्यक्ष - आ. हसन मुश्रीफ, डॉ. राजेंद्र शिंगणे, जयप्रकाश दांडेगावकर, गणेश दुधगावकर, प्रमोद हिंदुराव, डॉ. भारती पवार. सरचिटणीस - डॉ. संजीव नाईक, आ. अमरसिंह पंडीत, राजीव देशमुख, रणजितसिंह मोहीते पाटील, प्रदीप गारठकर, मुनाफ हकीम, बस्वराज पाटील नागराळकर, चिटणीस - धनंजय दलाल, सोशल मिडीया विभाग प्रमुख - आनंद परांजपे, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख - सारंग पाटील.