शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळा’साठी राष्ट्रवादीला करावा लागणार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 08:34 IST

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने चिन्हासाठी घ्यावी लागेल परवानगी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय पक्ष’ हा दर्जा रद्द झाल्यामुळे यावर्षी या पक्षाला महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर घड्याळ चिन्ह द्यायचे की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा राज्याचा दौरा सुरू असून आतापर्यंत विदर्भ, छत्रपती संभाजीनगर, तसेच कोकणातील पालघर जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला आहे. उर्वरित जिल्ह्यांचा दौरा जूनअखेर पूर्ण होईल, असे देशपांडे यांनी सांगितले. राज्य पातळीवरील पक्षांना संबंधित राज्याबाहेरही त्यांचे चिन्ह हवे असेल तर त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी लागते, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) हे ६ राष्ट्रीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत असतील. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान ४ राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे किंवा किमान ४ लोकप्रतिनिधी लोकसभेत निवडून येणे अपेक्षित आहे. शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा तरी निवडून येणे आवश्यक आहे किंवा किमान ४ राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे.

राज्य पातळीवरील पक्ष केवळ चारच     महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे चार पक्षच राज्यपातळीवरील पक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे त्यांना त्यांच्या अधिकृत पक्षचिन्हाने राज्यातील म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवता येते. ‘राज्यपातळीवरील पक्ष’ म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या किमान ८ टक्के तरी मते त्या पक्षाला मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता नसलेल्या पक्षांना मात्र राज्यपातळीवर निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवार