शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी अत्यंत प्रोफेशनल, शिवसेनेला केले कमजोर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 06:01 IST

विजय देशमुख यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात पीएफआयच्या बंदीचा उल्लेख आहे. इतरही नेत्यांचीसुद्धा नावे आहेत. त्यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रवादी हा अतिशय प्रोफेशनल पक्ष आहे. त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमजोर केले, नंतर तो पक्ष फुटण्यास बाध्य केले आणि आता ती रिक्त जागा प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हिंदुत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी सातत्याने काम करीत असल्याने ती रिक्त जागा राष्ट्रवादी भरून काढेल, असे मला वाटत नाही, असेही फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

विजय देशमुख यांना धमकीचे पत्र आले आहे. त्यात पीएफआयच्या बंदीचा उल्लेख आहे. इतरही नेत्यांचीसुद्धा नावे आहेत. त्यासंदर्भात पोलिसांना चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि पोलीस त्याची सखोल चौकशी करीत आहेत, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. नाशिकचा अपघात दुर्दैवी आहे. राज्य सरकार संपूर्ण मदत करते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदतसुद्धा जाहीर केली आहे. अपघाताची चौकशी होत आहे. असे अपघात भविष्यात होऊ नयेत, यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध कुभांड रचलेरश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. तत्कालीन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना हाताशी धरून कुभांड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत. पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकाऱ्यावर अन्याय करणार नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस