‘राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केवळ फायदा घेतला’

By Admin | Updated: July 25, 2014 01:32 IST2014-07-25T01:32:36+5:302014-07-25T01:32:36+5:30

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़

'NCP took advantage of Congress only' | ‘राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केवळ फायदा घेतला’

‘राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केवळ फायदा घेतला’

पुणो : लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसने प्रामाणिकपणो काम केले म्हणूनच राष्ट्रवादीचे चारपैकी दोन खासदार निवडून आल़े पण याचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसचा फायदा घेतला़ आघाडीमुळेच काँग्रेस कमकुवत होत आहे, याचा वेळीच विचार करा़ ते 144 जागा मागत आहेत, आपण 288 लढवू , अशा भावना काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केल्या़ 
कॉँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संकल्प मेळाव्यात जिल्हाध्यक्षांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्याबाबतच्या लोकांच्या प्रश्नांना आपण उत्तरे देऊ शकलो नाही. तेथेच पहिला पराभव झाला, असे पुणो जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष देवीदास भन्साळी म्हणाले.
गेल्या वेळी जिलतील चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बंडखोरी केली होती़ त्यांचा अनुभव चांगला नाही़ आता आघाडी केली तर हेच बंडखोर पुन्हा उभे राहतील़ स्वतंत्र लढल्यास सर्व जागा निवडून आणू, असा विश्वास सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी व्यक्त केला. सांगली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम म्हणाले, जिलतील चार जागा विरोधकांना गेल्या होत्या़ स्वतंत्र लढले तर निम्म्या जागा निवडून आणू़
सहकारी पक्षाने भ्रष्टाचार केला़ आमच्या नेत्यांवर आरोप झाल़े भ्रष्टाचारी लोकांना दूर ठेवा, असे कोल्हापूर जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सांगितले. साता:याचे जिल्हाध्यक्ष अनंतराव पाटील  म्हणाले, जिलतील 9 पैकी 5 नगरपालिका आपल्याकडे आहेत़ पण विधानसभेच्या 8 पैकी एकच जागा 99 पासून आपल्याकडे आह़े
स्वार्थापोटी काही जण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत होत़े आता चर्चेला पूर्ण विराम द्या़ स्वतंत्र लढायचे असेल तर आतापासूनच तयारी केली पाहिज़े, असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सांगितले. सतेज पाटील म्हणाले, आघाडी धर्म फक्त मंत्रलयात पाळला जातो़ संयुक्तपणो 288 जागा लढविल्या तरी टार्गेट 15क् असणार आह़े मग स्वतंत्र का लढवू नये?
 
..तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत़ या दोन्ही ठिकाणी सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून दिली. आमची मेहरबानी झाली नसती तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या, असे देवीदास भन्साळी यांनी सांगितल़े

 

Web Title: 'NCP took advantage of Congress only'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.