शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
2
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
3
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
4
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
5
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
6
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
7
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
8
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
9
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
10
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
11
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
12
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
14
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
15
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
16
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
17
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
18
जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
19
एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा
20
सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

NCP Supriya Sule : "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार"; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 10:39 IST

NCP Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) यांनी चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. यावेळी गणरायाच्या दर्शनामुळे मनाला सुख आणि आनंद मिळतो असं सांगितलं. तसेच दोन वर्ष कोरोना काळात कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते असंही म्हटलं आहे. याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. 

सुप्रिया सुळे यांनी "दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्ष अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते" असं म्हटलं आहे.  TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

सुप्रिया सुळेंनी याआधी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. '५० खोके ऑल ओके'वाल्या या सरकारला सर्वसामान्यांची सेवा करण्याची इच्छा नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. सध्यातील सरकारमधील लोक कार्यक्रम सोडतील तर जनतेची सेवा करतील ना...हे एवढे सेलिब्रेशन करण्यात येवढे मग्न आहेत की, बस्ता बांधला... त्यानंतर लग्न केलं... मात्र लग्नाचा अजूनही हनिमून सुरू आहे, असा टोला लगावला होता. तसेच ५० खोके ऑल ओके, सर्वसामान्य माणूस मात्र नॉट ओके, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं. 

मूळ मुद्द्याला बगल देण्याची भाजपची जुनी खेळी असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. महाआघाडीचे सरकार पाडण्यासाठी घाई केली मात्र सरकार पाडण्यासाठी इतर राज्याची मदत घ्यावी लागली ही  शोकांतिका म्हणावी लागेल . सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना झाली. हे मायबाप सरकार आहे आलिया भोगासी असेच या सरकार बद्दल म्हणावे लागेल, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली होती.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस