शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

गौप्यस्फोट करणार असतील, तर...; शरद पवारांचा अजितदादांसह प्रफुल पटेलांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 05:30 IST

सिंचन घोटाळ्याबाबतचे विधान पंतप्रधानांनी कोणासाठी केले?, मी प्रफुल्ल पटेल यांच्या पुस्तकाची वाट पाहतोय

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील एका सभेत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता, तो कोणाबद्दल होता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. अजित पवार यांनी मांडलेले विचार पक्षाच्या धोरणांशी विसंगत असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 

अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर त्यांच्या पक्षाचा नेता कोण, चिन्ह कोणते असे सगळे नमूद केले आहे. भाजपला मदत करण्यासाठी लोकांनी त्यांना मते दिलेली नाहीत, असेही पवार म्हणाले. पवार यांनी आमदारांची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुमन पाटील, अशोक पवार, पंडित क्षीरसागर आदी उपस्थित होते. अजित पवार यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. 

...त्यांना मी मंत्रिपद मागेन का? माजी मंत्री अनिल देशमुख यांना मंत्री करण्यास भाजपने नकार दिला, म्हणून ते आमच्याबरोबर आले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याला खुद्द अनिल देशमुख यांनीच उत्तर दिले. ज्या पक्षाने माझी खोटी चौकशी लावून मला त्रास दिला, त्यांच्याकडे मी मंत्रिपद मागेन का? असा प्रश्न त्यांनी केला.

राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे मतदारांना माहिती आहे. निवडणूक लढवताना, मते मागतानाची त्यांची भूमिका व त्यांनी आता घेतलेली भूमिका विसंगत आहे हे मात्र मला माहिती आहे. आमच्या चर्चा झाल्या; पण त्या पक्षाच्या विचारांशी, ध्येयधोरणांशी सुसंगत अशा विचारांवर झाल्या. त्यांना ज्या रस्त्यावर जायचे होते तिकडे मला आणि माझ्याबरोबर जे आहेत त्यांना जायचे नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा आहे हे मतदारांना चांगले माहिती आहे. अजित पवार यांची भूमिका पक्षाच्या विचारांशी विसंगत होती. लोकशाहीत त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे, मात्र निवडून येताना लोकांना जे सांगितले त्याचे काय करणार? असा सवालही शरद पवार यांनी केला.

पक्ष सोडून का चालले हेही लिहा...खासदार प्रफुल्ल पटेल पुस्तक लिहून त्यात अनेक गौप्यस्फोट करणार असतील तर मी त्या पुस्तकाची वाट पाहतो. त्यात त्यांनी एक चॅप्टर इडीने त्यांच्या घराच्या किती मजल्यांची कशी चौकशी केली त्याविषयी असूद्या, तसेच लोक हल्ली पक्ष सोडून का चालले आहेत हेही त्यामध्ये लिहा...अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटेल लिहिणार असल्याचा पुस्तकाची खिल्ली उडवली.

लोकच काय तो निर्णय घेतील बारामतीत किंवा कुठेही कोणालाही आपली मते, आपले विचार लोकांसमोर घेऊन जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर लोकच काय तो निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारPraful Patelप्रफुल्ल पटेल