शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:27 IST

Rohit Patil News: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Rohit Patil News: लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या उलथापालथीमुळे तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील समीकरणेदेखील बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांनी विधानसभेची तुतारी फुंकण्याची तयारी केली असून, कार्यकर्त्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच रोहित पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सूचक विधान केले आहे. 

मतदारसंघात अनेक दिवसांपासून काम करत आहे. दौरे करत आहे, लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. आर. आर. पाटील यांना काही कामे करायची होती. परंतु, त्यांचे निधन झाल्यामुळे ती झाली नाहीत. ती कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या आशा या कामाच्या माध्यमातून पूर्ण झाल्या पाहिजेत, असे मत रोहित पाटील यांनी व्यक्त केले.  तसेच आर. आर. पाटील यांनी एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोधकांनी तो प्रकल्प थांबवला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तासगाव कवठे महांकाळसाठी एमआयडीसी मंजूर झाली आहे, अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली. 

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आले पाहिजे

विधानसभेच्या बाबतीत मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि शरद पवार तसेच वरिष्ठ नेते मिळून एकत्रितपणे निर्णय घेतील. लोकसभेच्या निवडणूकमध्ये शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठा विजय खेचून आणू शकले. आगामी विधानसभेला आम्ही त्याच पद्धतीने सामोरे जाणार आहोत. कुठल्याची परिस्थितीत शरद पवार यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचे सरकार आले पाहिजेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे, अशी अपेक्षा रोहित पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून रोहित पाटील यांनी मतदारसंघात साखर पेरणी केली आहे. मात्र, विरोधी महायुतीकडून विधानसभेला निवडणुकीच्या रिंगणात कोण असणार हे अद्याप निश्चित नाही.  

टॅग्स :Rohit Patilरोहित पाटिलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस