शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:12 IST

एकीकडे अजित पवारांसोबत जाण्याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसनेही लक्ष वेधले आहे.

Supriya Sule: आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दुसरीकडे काका-पुतण्या एकत्र येण्याबाबतही अनेक कयास बांधले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटाकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी सूचक शब्दांत दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू येण्याच्या चर्चांसह काका-पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांनीही जोर धरलेला पाहायला मिळत आहे. 

हा माझा निर्णय नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामांची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशके पाहिली आहे. शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. यानंतर आता वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा यावर भाष्य केले आहे. 

अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान

अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही. त्याची काही निश्चित वेळ ठरलेली नाही. माझ्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना सर्वात महत्त्वाच्या आहेत. मी आत्ताच भारतात आले आहे. १४ दिवस परदेशात होते. त्यानंतर दोन दिवस दिल्लीत होते. त्यामुळे माझ्यापर्यंत अशी कुठलीही चर्चा आलेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. हे दोन्ही गट आज त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.

दरम्यान, एका बाजूला पक्ष एकत्रित येण्याबाबत चर्चा सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची बरीच चर्चा होऊ लागली आहे. “आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो त्यावेळी आपण काहीच करू शकत नाही”, असे सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या स्टेटसमध्ये म्हटले आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते माझे वयक्तिक आहे. माझ्या आईने मला सल्ला दिला तो मी माझ्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला ठेवला, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवार