शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:53 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसेने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. पण समोरून काही उत्तर आले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. मात्र आमच्या पदरात काहीच पडले नाही. समोरून काही उत्तर आले नाही. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा खुलासा केला. मात्र, निवडणूक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही.  निवडणूक आयोगावर दबाव असण्याची शक्यता आहे. दुबार मतदानाचे पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नाही. कोणत्याही चौकशी विना क्लिनचीट दिली जाते. याचा अर्थ या सर्वाचे निवडणूक आयोग समर्थन करत आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ. पुढे स्थानिक नेते त्यांच्या फिडबॅक काय येतो. त्याप्रमाणे नियोजन करून पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही

खरेतर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही. कारण दुर्देव आहे की, एका सशक्त लोकशाहीचा ज्याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे, तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतो, तो दुरूस्त करा. तंत्रज्ञान एवढे बदलले आहे की, ते आपले आयुष्य चांगले आणि सोपे करते. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात, दोन महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होत्या. काहीच घाई नव्हती. एवढी घाई का झाली. या महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केली.

स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा 

आम्ही जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतीसाठी एक विशेष सेशन बोलवा. चर्चा करू. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या. जसे ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तशी महाराष्ट्राला आता गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही आघाडी म्हणून लढणार आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा देण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीतून चालला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यासारख्या शहरात भरदिवसा काल क्रूर पद्धतीने हत्या झाली. हे पहिलेच प्रकरण नाही. मग पुण्याच्या कायदे सुव्यवस्थेवर कधी चर्चा होणार? महाराष्ट्रात गुन्हेगारी, गरिबी, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांची दर तीन तासाला एक आत्महत्या होते, हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे, जो त्यांनी विधानसभेत मांडला आहे. मग ही परिस्थिती असेल तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार का नाही बोलत आहे? असा संतप्त सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Why the Election Rush Now After 7 Years Delay?: Supriya Sule

Web Summary : Supriya Sule criticizes the Election Commission for ignoring voter fraud evidence. She questions the urgency for elections now, suggesting voter list errors be fixed first. Sule also urged the government to address Maharashtra's economic and social issues.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी