शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

“२०२४ वर्ष संमिश्र, साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा अन् आपल्या पक्षाचा DNA...”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:47 IST

NCP SP Group Jayant Patil Wishes On New Year 2025: सह्याद्रीसारख्या कणखर अशा शरद पवारांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

NCP SP Group Jayant Patil Wishes On New Year 2025: नवीन वर्ष सुरू झाले आहे. केवळ भारतात नाही, तर संपूर्ण जगभरात नववर्षाचे उत्साहात स्वागत केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राजकीय वर्तुळातील तसेच देशभरातील अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी देशवासीयांना नववर्ष २०२५ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी नवीन वर्ष २०२५ च्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्य एक पत्र लिहिले आहे. 

जयंत पाटील यांनी एक्सवर या पत्राची पोस्ट शेअर केली आहे. या पत्रात जयंत पाटील यांनी सरलेल्या २०२४ या वर्षाचा आढावा घेऊन आता पुढे पक्षाची वाटचाल कशी असेल, तसेच कार्यकर्त्यांनी नेमके काय विसरता कामा नये, याबाबत मन की बात बोलून दाखवली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे, ते जाणून घेऊया...

साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा अन् आपल्या पक्षाचा DNA...

प्रति, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार परिवारातील सर्व सदस्य, 

आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 

२०२४ हे वर्ष आपल्या पक्षासाठी अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक ८ खासदार निवडून आले तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र आपल्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असे यश आपल्याला मिळाले. अर्थात, या अपयशाची कारणीमिमांसा विविध स्तरांवर चालू आहेच. 

आता दीन दुबळ्यांची, पददलितांची, शेतकरी, कामगार व महिलांची लढाई पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज होण्याची ही वेळ आहे. सह्याद्रीसारख्या कणखर अशा आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, साहेबांचा कार्यकर्ता हा सदैव लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही. 

निवडणुकीत जे अपयश आले ते मागे सोडून आता पुढे जाऊयात. आजही आपल्या पक्षातील एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता जागेवरून हललेला नाही, हेच आपल्या पक्षाचे सर्वात मोठे यश आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्म रक्षणाच्या लढाईसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी सज्ज होऊयात ! छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले, शाहू आंबेडकर हा आपल्या पक्षाचा DNA आहे, हे आपण विसरता कामा नये. 

निवडणुकीतील लाट ही केवळ एकदाच येत असते म्हणूनच नव्या वर्षात एक नवीन सुरुवात करूयात. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आणि महाराष्ट्रातील नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.

पुन्हा एकदा आपल्याला व आपल्या कुटुंबातील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! 

सदैव आपलाच, जयंत पाटील 

टॅग्स :New Year 2025नववर्षाचे स्वागतNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटील