शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 23:51 IST

NCP SP Group Eknath Khadse News: ४० ते ४५ वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मी जिवाचे रान केले. मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. आता भाजपात ९० टक्के लोक बाहेरचे आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group Eknath Khadse News: मी माझे संस्कार विसरलेलो नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. ही गोष्ट मी अभिमानाने अनेकदा सांगितली आहे. मी त्या शिस्तीत राहिलेलो आहे. ४० ते ४५ वर्ष भारतीय जनता पक्ष वाढवण्यात मी जिवाचे रान केलेले आहे. त्यामुळे एकाच दिवसांत सारे संस्कार विसरता येतात असे नाही. परंतु, शरद पवार यांनी मला अंधाराच्या कालखंडात उजेडात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे शरद पवार यांचे ऋण मी विसरू शकत नाही, असे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

पत्रकारांशी बोलताना एकनाथ खडसे यांना भाजपा प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, मी अनेकवेळा सांगितले आहे की, भारतीय जनता पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. त्या गोष्टीला आता मी पूर्णविराम दिलेला आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत राहणार आहे, असे मी अनेकवेळा मांडले आहे. परंतु, वारंवार चर्चा होतात आणि मग मनोरंजन होते, करमणूक होते, अशी खोचक प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. या सगळ्याला गिरीश महाजन कारणीभूत आहेत का, असा सवाल एकनाथ खडसे यांना करण्यात आला.

गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता

यावर बोलताना, मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन माझा सामान्य कार्यकर्ता होता. मी मंत्री असताना त्याला मंत्रिमंडळात स्थान नव्हते. मी गेल्यावर तो कार्यकर्त्याचा मंत्री झाला, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच भाजपाच्या विरोधात दोन ठाकरेंनी एकत्र आलेच पाहिजे. सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्या सर्वांनी एकत्र आल्यास आगामी निवडणुकात चांगले यश मिळेल, असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपा हा पूर्वी भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त अशा विचारधारेने चालणार पक्ष होता. मात्र, आता पूर्वीचा भाजपा राहिला नाही. ज्या लोकांवर भाजपनेही आरोप केले असे ९० टक्के बाहेरचे लोक भाजपमध्ये आहेत. पूर्वी भाजपाची विचारधार वेगळी होती, असे खडसे यांनी म्हटले आहे. भाजपाच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहे का, अशी विचारणा खडसे यांना करण्यात आली होती. यावर, या प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार आहे, असे खडसे यांनी सांगितले.

 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा