शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुडमॉर्निंग अण्णा! 'आमच्यासाठी आंदोलन कधी?'; राष्ट्रवादीनं व्यंगचित्रातून अण्णा हजारेंना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 22:29 IST

झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे तर चक्क गॅस सिलेंडरच 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न करणारं व्यंगचित्र राष्ट्रवादीनं काढलं आहे.  

मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन पुकारणार असल्याचं जाहीर करताच राष्ट्रवादीनं अण्णा हजारेंना टोला लगावला आहे. एका व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीनं अण्णांवर टीकास्त्र सोडलं आहे. पेट्रोल पंप 'गुडमॉर्निंग अण्णा' बोलतोय तर गॅस सिलेंडर 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न विचारतंय अशा व्यंगात्मकरित्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारे यांना जोरदार चिमटा काढला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, देशात गॅस सिलेंडर, पेंट्रोल-डिझेल दरवाढ झाली पण अण्णा हजारे आंदोलनाला पुढे आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर व्यंगचित्र काढलं. यात पेट्रोल पंप 'गुडमॉर्निंग अण्णा' बोलतोय तर गॅस सिलेंडर 'आमच्यासाठी आंदोलन कधी? असं शेजारी बसलेल्या आणि झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचं दाखवलं. अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. मात्र राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे असं त्यांनी सांगितले. 

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे मात्र राष्ट्रवादीनं व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल-डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार फटकारे लगावले आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे तर चक्क गॅस सिलेंडरच 'आमच्यासाठी आंदोलन कधी?' असा प्रश्न करत आहे. 

काय म्हणाले होते अण्णा हजारे?

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले, तसेच सरकारला इशाराही दिला. मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारेंनी दिला. नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे साकडे घातले होते. 

अण्णा होते कुठे इतके दिवस?; - राज ठाकरे

मंदिर उघडण्यात येत नसल्याच्या सरकारच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने लवकरच मंदिरं न उघडल्यास आम्ही मंदिराबाहेर घंटनाद आंदोलन करणार असल्याचं राज यांनी सांगितलं. तसेच, अण्णा हजारेंनी इशारा दिलाय, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, अण्णांना चिमटाही काढला. अण्णा होते कुठे इतके दिवस?, असे म्हणत राज यांनी अण्णांच्या आंदोलन इशाऱ्यावर चिमटा काढला.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNCPराष्ट्रवादी काँग्रेस