शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar News सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा नामंजूर, समितीने ठरावच केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:17 IST

NCP Sharad Pawar's resignation was rejected, the committee approved the resolution शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.

मुंबई - लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवार  Sharad Pawar यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली. पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही धक्का बसला. शरद पवारांनी पुढील अध्यक्ष निवडण्यासाठी समितीची नेमणूक केली होती. मात्र शरद पवारांनी राजीनामा देऊ नये अशी आक्रमक भूमिका नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मांडली. त्यानंतर आज पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली. 

या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर समिती आता त्यांचा निर्णय शरद पवारांना कळवणार आहे. त्यामुळे शरद पवार आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम राहावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेल्या ३ दिवसांपासून हे आंदोलन राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ सुरू आहे. 

राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आज सकाळी राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. यावेळी भिवंडी येथील राष्ट्रवादीच्या युवक जिल्हाध्यक्षाने अंगावर पेट्रॉल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि इतर कार्यकर्त्यांनी वेळीच सतर्कता दाखवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अजितदादा येताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार याच बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले. अजित पवार पक्ष कार्यालयाच्या परिसरात येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा सुरु केल्या. 'देश का नेता कैसा हो...शरद पवार जैसा हो...', अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी कोणतीही रिअॅक्शन न देता पक्षाच्या कार्यालयात निघून गेले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस