शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

“दोन्ही समाजात कटुता अन् वाद निर्माण होऊ नये अशी आमची भूमिका”: जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 15:41 IST

Jayant Patil News: मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

Jayant Patil News: एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षणावरून महायुतीतच महाभारत सुरू असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी टीका केली आहे. 

छगन भुजबळ यांची अशी भडक विधाने करायची जुनी सवय आहे. काही वेगळे वाटत असेल तर भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ मागून घ्यावी, भेटून चर्चा करावी. ओबीसी आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार नाही. अशी शक्यता नाही. मात्र, आपले आरक्षण काढून दुसऱ्यांना दिले जाणार आहे, असे भासवायचे. तुमचे जाणारे आरक्षण मी थांबवले, असे सांगायचे, मोठेपणा घ्यायचा, असे आता वाटू लागले आहे. छगन भुजबळ यांना वास्तविक ही सगळी परिस्थिती आणि प्रक्रिया माहिती आहे. तरीही संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हे १०० टक्के चुकीचे आहे, या शब्दांत शंभुराज देसाई यांनी हल्लाबोल केला. यानंतर आता यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. 

कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची

हा दोन्ही बाजू सांभाळण्याचा प्रकार दिसतोय. काही लोकांनी या बाजूचे बोलायचे आणि काहींनी दूसऱ्या बाजूचे बोलायचे असे काही आहे का हे तपासले पाहिजे. या बाबतीत सरकारने एकमत केले पाहिजे. मुख्यमंत्री एक बोलतायत, उपमुख्यमंत्री दुसरे बोलत आहेत आणि आता मंत्री वेगळे बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे एकमत करावे. आमची यावर भाष्य करण्यची इच्छा नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दोन्ही समाजात वाद होऊ नये अशी आमची भूमिका आहे. यांना आरक्षण मिळत असेल तर दुसरीकडे कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे. आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJayant Patilजयंत पाटील