शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, आरक्षणाची मर्यादा हटवण्यासह दिली ही आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 10:55 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव दिलं आहे. तसेच या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, गरीब अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे शरद पवार गटाने म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. शरद पवार गटाने आपल्या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव दिलं आहे. तसेच या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, गरीब अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे शरद पवार गटाने म्हटलं आहे. सध्या गाजत असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नासह, जातिनिहाय जनगणाना, महिलांना आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तरुणांना पदवीनंतर एक वर्ष आर्थिक मदत, जीएसटीमध्ये सुधारणा, ५०० रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलवरील कराबाबत फेरविचार, अशी अनेक आश्वासने या शपथनाम्यामधून देण्यात आली आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचा शपथनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. या शपथनाम्यामध्ये जातिनिहाय जनगणना करण्याचे तसेच आरक्षणाची सध्याची असलेली ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण  आणि विधिमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षणाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन शपथनाम्यातून देण्यात आले आहे. 

तसेच शेतकऱ्यांच्या पिकांना हमिभाव मिळवून देण्यासाठी आणि कर्जमाफीसाठी एका आयोगाची निर्मिती करण्याचं, तसेच शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी न आकारण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. मागच्या काही काळात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्याचं, तसेच पेट्रोल आणि डिझेलवरील करांचा पुनर्विचार करण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलेलं आहे.

बेरोजगारीच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयांमधील कंत्राती भरती बंद करण्याचं तसेच पदवी मिळाल्यानंतर एक वर्षापर्यंत तरुणांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासनही शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यामधून देण्यात आलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणार- जातिनिहाय जनगणना करणार- सरकारी नोकरीत महिलांना ५० टक्के आरक्षण-पदवीधरांना एक वर्ष आर्थिक मदत- शेतकऱ्यांना हमिभाव आणि कर्जमाफीसाठी आयोग- सिलेंडर ५०० रुपयांत देण्याचा विचार- ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना- शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही- महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदा करणार

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४