शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटातील आमदार-खासदार अजितदादांच्या गळाला? समर्थन पत्रही दिले! तर्क-वितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 11:59 IST

Sharad Pawar Group And Ajit Pawar Group: अजित पवार गटाला पाठिंबा देणारे शरद पवार गटातील दोन बडे नेते कोण? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Sharad Pawar Group And Ajit Pawar Group:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. दोन्ही गटांनी आपापले म्हणणे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मांडले असून, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला सुनावणी होणार आहे. यातच शरद पवार गटातील एक आमदार आणि एक खासदार अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा असून, या दोन बड्या नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थनपत्रही दिल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केल्यानंतर आमदार, खासदार, नेते मंडळींना वळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, शरद पवार गटाकडील दोन बडे नेते अजित पवार गटात जाणार असून, या दोन्ही नेत्यांनी अजित पवार गटाला समर्थन पत्र दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे. 

अजित पवार गटाला समर्थन देणार आमदार-खासदार कोण?

राष्ट्रवादीतील या आमदार आणि खासदाराने अजित पवार गटाला समर्थन देत असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. अजितदादांना समर्थन देणारे ते आमदार आणि खासदार कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवार यांना लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे आणि श्रीनिवास पाटील यांचा पाठिंबा आहे. तर राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान या शरद पवार गटात आहेत. या चार खासदारांपैकी समर्थन देणारा तो खासदार कोण? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पार पडलेल्या शपथविधीवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. त्यानंतर ते पुन्हा शरद पवार गटाकडे आले. 

दरम्यान, अजित पवार गटात जाणारे आमदार-खासदार कोण, यावरून तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अजित पवार गटाला समर्थन करणारा हा खासदार आणि आमदार शरद पवार गटामध्ये असला तरी योग्य वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. विधिमंडळ अध्यक्षांकडे अजित पवार गटाकडून पक्ष विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. मूळ राष्ट्रवादी आपलीच असल्याचे सांगत अजित पवार गटाने ही मागणी केली आहे.

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार