शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 12:13 IST

पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास १२ जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात असल्याचे समजते.

NCP Sharad Pawar ( Marathi News ) :लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून खलबतं सुरू आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही नेते दाखल झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी १२ जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केल्याचे समजते. 

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार महायुतीत सामील झाले असले तरी शरद पवार गट मात्र महाविकास आघाडीतच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पक्षाची जिथे ताकद आहे अशा जवळपास १२ जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात आपल्याला मिळाव्यात यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. या मागणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासह काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

कोणत्या जागांसाठी पवार गट आग्रही?

राष्ट्रवादी शरद पवार गटाने मागील लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या सातारा, बारामती, शिरूर, रायगड या चार जागांसह इतर आणखी आठ जागांवर दावा सांगितल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील माढा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, दिंडोरी आणि अहमदनगर या जागा, तसेच मराठवाड्यातील बीड, विदर्भातील अमरावती आणि मुंबईजवळच्या भिवंडी मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार कलगीतुरा रंगत आहे. खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला २३ जागांची मागणी केल्यानंतर काँग्रेसकडून माजी खासदार संजय निरुपम यांनी राऊतांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीकडूनही १२ जागांबाबत आग्रह धरण्यात आल्याची माहिती समोर आल्याने जागावाटपाचा हा तिढा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कसा सोडवला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा