शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?; रूपाली चाकणकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 12:42 IST

Petrol-Diesel Price Hike : निवडणुकांचे निकाल लागल्यापासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होत आहे सातत्यानं वाढ

ठळक मुद्दे निवडणुकांचे निकाल लागल्यापासून देशात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होत आहे सातत्यानं वाढ

नुकतेच पश्चिम बंगाल येथील निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी तृणमूल काँग्रेसनं त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. दरम्यान, निवडणुकांच्या निकालानंतर सातत्यानं पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यावरून " सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोलडिझेलवर का काढताय?," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे."दर महिन्याला भारतात निवडणुका असत्या तर किती बरं झालं असतं. काही नाही तर निदान पेट्रोल डिझेलचे भाव तरी स्थिर राहिले असते. पाच राज्यांच्या निवडणुक निकालापासून आजची सलग चौथ्या दिवशी भाववाढ. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?," असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली.  

देशात आज सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळालं. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २७ पैशांनी वाढून ९७.६१ रुपयांवर पोहोचले. तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ झाली. मुंबईत डिझेलचे दर ८८.८२ रूपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे दिल्लीमध्येही पेट्रोलचे दर २८ पैशांनी वाढून ९१.२७ रुपयांवर पोहोचले.

 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीIndiaभारत