शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘३५ मिसळ’ कल्पनेनंच कसंतरी झालं!; रोहित पवार यांचे मिश्कील टिप्पणी ट्वीट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 11:53 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान केले होते. त्या विधानावरच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती. 

जामखेड (जि. अहमदनगर) : माहीजळगाव येथील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५ मिसळ’ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झालं, असं गमतीदार ट्विट आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ‘देवेंद्रांनी ३५ पुरणपोळ्या, पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान केले होते. त्या विधानावरच रोहित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली असावी, अशी खमंग चर्चा मतदारसंघात सुरू होती. 

एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘३५ पुरणपोळ्या पातेलंभर तुपात खाल्ल्या होत्या’, असे विधान नुकतेच केले होते. त्यांच्या या विधानाची राज्यभर चर्चाही झाली होती. आमदार रोहित पवार हे सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर होते. दुपारी दीड वाजता भूक लागल्याने कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी माहीजळगाव येथील एका हॉटेलमध्ये मिसळ खाल्ली. त्यानंतर त्यांनी एक ट्विट केले. ‘मतदारसंघात असताना भूक लागल्याने माहीजळगावमधील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली. एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५ मिसळ’ खाण्याच्या केवळ कल्पनेनंच कसंतरी झालं’, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले. त्यानंतर रोहित यांनी अमृता यांना त्यातून टोला लगावल्याची चर्चा सुरू झाली आहे.  बिलही पेड केलंय... दिवा या रेल्वेमार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी वडापाव खाल्ला. मात्र, बिल न देताच निघून गेले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. तोच धागा पकडून रोहित पवार यांनी मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही. तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केलंय, असे ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAmruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस