शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Rohit Pawar : "कुणाकुणाचा आवाज दाबणार?, इतका कपटीपणा..."; तेजस्विनीवरून रोहित पवार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 10:59 IST

NCP Rohit Pawar And Tejaswini Pandit : तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमाफीबाबत माध्यमांसमोर केलेलं विधान आणि प्रत्यक्षात मोठी विसंगती दिसून आली आहे. मनसेने पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान टोलमाफीच्या या मुद्दयावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने थेट भूमिका घेतल्याचं दिसून आलं. मात्र, तिने भूमिका घेतल्यानंतर तिच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. 

तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत. "हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही" असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असा संतप्त सवाल ही रोहित पवार यांनी विचारला आहे. 

"विरोधात व्हिडीओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु  सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच TejswiniPandit हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

तेजस्विनी पंडितने यानंतर कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं आहे. "माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही."

"सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!" असं तेजस्विनी पंडितने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारTejaswini Punditतेजस्विनी पंडितtollplazaटोलनाका