शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

“प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये, आमचं ठरलंय”; रोहित पवारांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:16 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केले, याबद्दल आपले आभार, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

अहमदनगर: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करताना अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. याला भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी रोहित पवार यांना प्रत्युत्तर दिले. यावर आता पुन्हा रोहित पवारांनी पलटवार केला आहे. त्यामुळे रोहित पवार आणि प्रवीण दरेकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगताना दिसत आहे. 

जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना रोहित पवार म्हणाले होते की, २०१४ चे खरे मुख्यमंत्री भाजप नेते गोपीनाथ मुंडे होते. आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती. रोहित पवारांना उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले की, रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी. आधी त्यांच्या घरातील मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवावे. उगीच वाद निर्माण करू नये. अजित पवार सांगतात ते रोहित पवारांनी लक्षात घ्यावे, असे प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांनी दिले होते. यावर आता रोहित पवारांनी ट्विट करत पलटवार केला आहे. 

प्रवीण दरेकरजी, पवार कुटुंबाची आपण चिंता करु नये

काही राजकीय नेत्यांचे कर्तृत्व राजकारणाच्या पलीकडे असते. तसेच कर्तृत्व स्व. मुंडे यांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळे स्व. मुंडेंविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचे दरेकर यांनी स्वागत करायला हवे होते. परंतु, तसे न करता उलट त्यांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली. हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे यांच्या निधनानंतर दरेकर भाजपमध्ये आल्याने त्यांना मुंडे साहेब समजले नसावेत. आणि हो. पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचे ठरलेय. त्यामुळे दरेकर यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केले, याबद्दल आपले आभार, असा टोलाही रोहित पवार यांनी शेवटी लगावला. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारpravin darekarप्रवीण दरेकर