शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली” 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 12:36 IST

Rohit Pawar News: सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे.

Rohit Pawar News: ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या टॅगलाईनखाली एक जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिरिक्त कोणाही अन्य नेत्याचा फोटो देण्यात आला नव्हता. यावरून नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते भाजप-शिवसेना शिंदे गटावर खोचक टीका करत आहेत. जाहिरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला.

आधीच्या जाहिरातीनंतर आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो असलेली नवीन जाहिरात देण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांसह शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो देण्यात आले आहेत. रोहित पवार यांनी दोन्ही जाहिरातींची फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये रोहित पवारांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती

रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात की, इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती आणि मनाला झालेली इजा परवडणार नसल्यानेच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी. असो! सरकारने कामं केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती.त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळंच राज्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय... यांच्या काही नेत्यांना पदं मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आलाय.. सरकार केवळ जाहिरातीतच दिसत असल्याने बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का? असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून केला.

दरम्यान, आधीच्या जाहिरातीवरून आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, आता भाजपच्या आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकलेली दिसते. पडद्यामागे काय गोष्टी घडल्यात हे मला माहिती आहे. जाहिरातीचा प्रकार हा सगळा हास्यास्पद प्रकार झाला. त्यांच्या मनात काय ते यावरून स्पष्ट झाले. त्यानंतर आता नवीन जाहिरातीत चित्र बदलेले असले तरी प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, हे स्पष्ट दिसत आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस