शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:07 IST

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपापल्या भागात प्रभाव असलेल्या नेत्यांचा (सरदारांचा) एकत्रित पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी या पक्षाची व्याख्या केली जाते, मग आता या सरदारांनाच आपल्याकडे ओढले तर आपोआपच या पक्षाला घरघर लागेल अशी रणनीती भाजप व शिवसेनेने आखली असून त्यानुसार एकेका सरदारांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा दोघांमध्ये सुरू आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आमचे कमीत कमी ५० आमदार नक्कीच निवडून येतील, असे छातीठोकपणे सांगत होते. ३५ नेते असे आहेत की जे त्या-त्या भागात अत्यंत प्रभावी आहेत आणि ते पराभूत होण्याचा प्रश्नच नाही, उर्वरित १५ जागा जिंकणे आमच्यासाठी कठीण नाही, असा तर्क त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मांडत होते. ५० तर नाही पण राष्ट्रवादीने ४२ जागा जिंकल्या आणि जयंत पाटीलांपासून मनोहर नाईकांपर्यंत असे पक्षाचे सरदारच बहुतेक जिंकले होते. प्रभावी नेत्यांची मजबूत फळी हे राष्ट्रवादीचे गंडस्थळ, त्या गंडस्थळावरच हल्ला करण्याची खेळी भाजप-शिवसेनेकडून खेळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असे सरदार आपल्या गळाला लावणे आधीच सुरू केले आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय खेळीचा भाग म्हणून राज्याच्या विविध भागामध्ये राजकीय घराणी उभी केली आणि त्यांना ताकद देण्याचे काम केले. विखेंसारख्या काही घराण्यांना कायम सुरूंग लावण्याचेही अनेकदा प्रयत्न केले.भुजबळ सेनेच्या वाटेवरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दणका देत त्यावेळचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांना पवारांनी काँग्रेसमध्ये आणून राज्यात वादळ निर्माण केले. तेच भुजबळ आज शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.

सावल्यांनी साथ सोडलीकाँग्रेसच्या आदिवासी नेत्यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मधुकर पिचड आणि विजयकुमार गावित यांना पुढे केले. आज दोघेही भाजपमध्ये आहेत. भुजबळांप्रमाणेच गणेश नाईक या कट्टर शिवसेना नेत्यास पवारांनी सोबत घेतले. तेच नाईक आज राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. पवारांना त्यांच्या सावल्या सोडून जात आहेत.

राजे तुम्ही सुद्धा!साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पुसदच्या नाईक घराण्यातील निलय नाईक हे पूर्वीच भाजपमध्ये गेले आणि आता विधान परिषदेचे सदस्य आहेत. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे आणखी काही नेते भाजप वा शिवसेनेत जाताना दिसतील.

भीती उरली नाहीज्या घराण्यांना पवारांनी बळ दिले त्याच घराण्यांतील सरदारांना आता त्यांच्यासोबत राहणे राजकीय असुरक्षिततेचे वाटत असल्याने एकेक जण साथ सोडून जात असल्याचे चित्र आहे. पवारांना साथ दिली नाही तर ते आपलं राजकारण संपवतील अशी भीती पूर्वी वाटायची. आज ती भीती राहिली नसल्याने त्यांची साथ सोडण्याचे धारिष्टय त्यांच्या जवळचे लोक करू लागले आहेत.सरदार पळू लागलेबीडच्या राजकारणाचा विचार ज्या क्षीरसागर घराण्याशिवाय करता येत नाही त्यातील जयदत्त क्षीरसागर यांनी साहेबांची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि लगेच मंत्रीदेखील झाले. शिवसेनेला धक्का देत काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत गेलेले आ. भास्कर जाधव हे शिवसेनेच्या मार्गावर आहेत.सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे पवारांचे निष्ठावान पण ते उद्या शिवबंधन बांधून घेत आहेत. याच जिल्ह्यातील करमाळ्याच्या बागल परिवाराने नेहमीच पवारांना साथ दिली पण गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीत अत्यल्प मतांनी पराभूत झालेल्या रश्मी बागल परवा शिवसेनेत गेल्या.अहमदनगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिवसेनेच्या मार्गावर असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेChagan Bhujbalछगन भुजबळ