शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Supriya Sule Exclusive: सातच्या आत घरात...; सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 18:42 IST

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त; जागवल्या बालपणीच्या आठवणी

मुंबई: आम्ही अतिशय शिस्तीत वाढलो. आताच्या मुलांना आहे तितकं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं आणि तो काळदेखील वेगळा होता. मी शाळेत असताना बाबा मंत्रालयात जाताना कधीतरी मला शाळेजवळ सोडायचे. मात्र तेव्हा मी त्यांना शाळेपासून दूर असलेल्या कोपऱ्याजवळ सोडायला सांगायचे. कारण शाळेत बाबा सोडायला येतात आणि तेही गाडीनं हेच मला पटायचं नाही, आवडायचं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी सुळेंशी संवाद साधला.

आताच्या काळात वडील मुलांच्या बाबतीत अतिशय सजग असतात. त्यांच्या अभ्यासावर त्यांचं लक्ष असतं. मी लहान होते, त्यावेळची परिस्थिती अतिशय वेगळी होती. आपलं मूल कोणत्या इयत्तेत शिकतंय, याचीही त्यांना माहिती नसायची. ती आघाडी आईकडे असायची. मात्र बालपणीचे ते दिवस अतिशय छान होते, असं म्हणत सुप्रिया सुळे लहानपणीच्या आठवणींत रमल्या.काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? शरद पवारांनी परखड शब्दात सुनावलं

आजच्या पिढीला मिळत असलेलं स्वातंत्र्य आणि पवार घराण्यातील शिस्त याबद्दल सुळे भरभरून बोलल्या. 'एका अतिशय मोठ्या घरात माझा जन्म झाला. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. ते विचारांनी प्रगत आहे. मात्र कपड्यांच्या बाबतीत वगैरे आम्ही तितके प्रगत नाही. मी तरुण असताना सातच्या आत घरात असा नियम होता. त्यानंतर कुठे जायचं असल्यास भावांसोबत जाऊ शकत होते. माझ्या मैत्रिणी रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू शकत होत्या. मला मात्र ती परवानगी नव्हती,' असं सुळे यांनी सांगितलं.

पश्चिम महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जास्त चांगली की मुंबईची असा वाद तुमच्या घरात कधी होतो का, यावर आमच्याकडे सगळे एकत्र असल्यावर कोणाकडचा मसाला उत्तम यावर एक तास तासांचा परिसंवाद घडू शकतो, असं उत्तर सुळेंनी दिलं. माझं सासर पवारांच्या तुलनेत लाखपटीनं मॉडर्न आहे. सासूबाई अँग्लोइंडियन आहेत. त्यामुळे त्यांच्याकडची एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे. तुमच्याकडचा मसाला जास्त छान की आमच्याकडचा यावर घरात तीन तास गप्पा होऊ शकतात अशी परिस्थिती आहे, असं सुळेंनी हसतहसत सांगितलं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार