शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kasba Bypoll Election Result 2023: “मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 20:45 IST

Kasba Bypoll Election Result 2023: रवींद्र धंगेकर मूळचे बारामतीमधील असल्याने हा विजय आनंद द्विगुणित करणारा आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.

Kasba Bypoll Election Result 2023: महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. तब्बल ३० वर्षांनी भाजपचा कसब्यात पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य करताना भाजपवर सडकून टीका केली आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर मूळचे बारामती लोकसभा मतदारसंघातील आहेत. त्यांचा विजय हा आनंद द्विगुणित करणारी बाब आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केलेल्या संघटित प्रयत्नांचा हा विजय आहे. मराठी माणूस पैशांत विकला जात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राजकीय पक्षापेक्षा हा विजय कार्यकर्त्यांचा आहे. त्यामुळे या विजयाचे खरे श्रेय कार्यकर्त्यांना जाते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. 

जनतेने ठरवले की कुणाच काही चालत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कसबा निकालावर प्रतिक्रिया दिली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना जाऊन सांगितले की, आम्ही रविंद्र धंगेकर यांना मदत करणार आहे तुम्हाला जी कारवाई करायची आहे ती करा, कुणीही आघाडी केली की जनतेने ठरवले की कुणाच काही चालत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही भाष्य करताना, ही परिवर्तनाची नांदी आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. कसब्यात आतापर्यंत शिवसेनेच्या पाठिंब्याने भाजप जिंकत आली आहे. महाराष्ट्राला, दिल्लीला आणि फडणवीसांना कळले असेल की खरी शिवसेना कुठे आहे. चिंचवडची जागाही आम्ही पहिल्या फेरीपासून जिंकू शकत होतो. तिथे अजून संघर्ष सुरू आहे. पण तिथे भाजप आणि मिंधे गटाने तिसरा उमेदवार उभा करून मतांची विभागणी केली. पुढच्या वेळी आम्ही चिंचवडही जिंकू, महाराष्ट्रही जिंकू, ही सुरुवात आहे. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उद्ध्वस्त करू, असा थेट इशारा संजय राऊतांनी दिला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेBJPभाजपा