शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना जामीन मंजूर, रोहित पवारांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 15:10 IST

Rohit Pawar on Sanjay Raut Bail : जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी (Patra Chawl Land Scam) 100 दिवसांनंतर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक ट्विट करुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. वाघ पिंजऱ्यातून बाहेर येत असल्याचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे आणि या पोस्टला 'सत्यमेव जयते' असा हॅशटॅग वापरला आहे. 

संजय राऊत (Sanjay Raut) हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावर त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊत यांना जामीन मिळणे हा ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. 

दरम्यान, 31 जुलैला अटक झाल्यापासून संजय राऊत हे कोठडीतच होते. सुरूवातीला ते ईडीच्या कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे न्यायालयाकडून वाचन करण्यात आले. त्यात कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला आहे.

शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले - सुषमा अंधारे आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण असून शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाला दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या,  शिवसैनिकांमध्ये आज हजार हत्तीचे बळ संचारले संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे. आज आमच्यासाठी दिवाळीचा क्षण आहे. आज खऱ्या अर्थाने दिवाळी असून आम्ही उत्साहाने साजरी करणार आहे. आमच्यासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आमचा सेनापती परत आला आहे. त्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांमध्ये हजार हत्तीचे बळ संचारले आहे. आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSanjay Rautसंजय राऊत