शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 10:59 IST

या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष कोर्टातील न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी १८ जुलैला तिन्ही आरोपींना समन्स बजावले आहे

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवार यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करत ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने ९ जुलै २०२५ रोजी या प्रकरणी तिसरी चार्जशीट कोर्टात दाखल केली. त्यात नव्याने ३ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. ज्यात शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यांसह बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनी आणि राजेंद्र इंगवले यांच्या नावाचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावण्यात आला आहे.

या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या विशेष कोर्टातील न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी १८ जुलैला तिन्ही आरोपींना समन्स बजावले आहे. येत्या २१ ऑगस्टला या तिघांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मुंबईतील एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात सुरेंद्र अरोरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ईडीने २०१९ पासून याचा तपास सुरू केला होता. २०१५ साली याबाबत सार्वजनिक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली. यापूर्वी ईडीने या प्रकरणी एक मुख्य आरोपपत्र आणि २ पुरवणी चार्जशीट दाखल केली आहे. ज्यात एकूण १४ लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या प्रकरणात रोहित पवार यांची २०२४ मध्ये ईडीने चौकशी केली होती. जानेवारी २०२४ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट करत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ईडीने २४ जानेवारी २०२४ आणि १ फेब्रुवारी २०२४ या दोन्ही दिवशी रोहित पवार यांची अनुक्रमे १२ आणि साडे आठ तास चौकशी केली होती.  कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर त्याचा राज्य सहकारी शिखर बँकेतर्फे लिलाव करण्यात आला होता. या लिलावासाठी इच्छुक कंपन्यांनी विविध बँकांतून पैसे उचलले होते. 

या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास ईडीने सुरू केला. अनेक सहकारी कारखाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी, संचालक यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि खासगी कंपन्यांना कमी किंमतीत व प्रक्रियेला वगळून कारखाना विकल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय