शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Monsoon Session: राष्ट्रवादीचे आमदार संभाजी भिडेंच्या वेशभूषेत अवतरतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 11:26 IST

राष्ट्रवादीकडून संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी

नागपूर: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधीमंडळ परिसरात दाखल झाले. संभाजी भिडे यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 'संभाजी भिडे यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. मनुस्मृती ही पहिली राज्यघटना होती, असं संभाजी भिडे म्हणतात. आम्हाला मिळालेले अधिकार हे मनूनं दिले आहेत की संविधानानं दिले आहेत, हे सरकारला विचारण्यासाठी मी या वेशभूषेत आलो आहे,' असं प्रकाश गजभिये यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. राज्य सरकार लोकांना न्याय देण्यात कमी पडत असल्याची टीका यावेळी गजभिये यांनी केली. 'फडणवीस सरकार राज्यातील जनतेला न्याय देण्यात कमी पडतं आहे. या आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या सरकारला जाग करायला आम्ही आलो आहोत,' असंही ते पुढे म्हणाले. पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये हे अधिवेशन होत आहे. 

टॅग्स :Sambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस