शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

Maharashtra Cabinet Expansion : मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:46 AM

Maharashtra Cabinet Expansion : कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

https://www.lokmat.com/topics/maharashtra-government/मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36  नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रवादीकडून नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह 13 नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तर 'मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, गेल्या 32 वर्षे शरद पवारांसोबत काम केलं आहे. आजच्या राजकीय परिस्थितीचा विचार करताना सगळे मोठे पोर, सर्व साखर कारखानदार, सर्व मोठी लोक आजूबाजूला असताना सर्वसामान्य परिस्थितीतून येथे येताना पवारांनी हाताला धरुन किंवा करंगळीला धरुन चालवलं. त्याबद्दल कायम उपकाराची किंवा कृतज्ञतेची भावना मनात असेल अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

तर यावेळी तुम्हाला कोणतं मंत्रिमंडळ आवडले असे जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, मला मंत्रिमंडळात घेतलं हे माझं नशिब आणि तुम्ही विचारता कोणंत मंत्रिमंडळ देऊ, असे आव्हाड म्हणाले.

मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पत्ता कट करण्यात आला असून अब्दुल सत्तार यांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडministerमंत्रीPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार