शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

Maharashtra Karnataka Border Dispute: “महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो! हिम्मत दाखवा, बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 22:52 IST

Maharashtra Karnataka Border Dispute: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचत खुले आव्हान दिले आहे.

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्रातील आमदारांना बेळगावमार्गे कर्नाटकला जाऊन येण्याचे आव्हान दिले आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. महाराष्ट्र इतका कमजोर नाही की आमच्यावर कन्नडिगांनी हल्ला करावा आणि तो आम्ही सहन करावा. जर शरद पवार कर्नाटकमध्ये गेले तर आम्हीही लाखोंच्या संख्येने त्याठिकाणी जाऊ. आंदोलन करू आणि बोमई यांना माफी मागायला भाग पाडू, अशा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत खुले आव्हान दिले आहे. 

बेळगावमार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच

अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सुरतमार्गे गुवाहाटी जाणाऱ्या महाराष्ट्रातील बहाद्दर आमदारांनो !  महाराष्ट्र संकटात आहे, हिंदुत्व धोक्यात आहे हिम्मत दाखवा, बेळगाव मार्गे एकदा कर्नाटकला जाऊन याच..., असे ट्विट अमोल मिटकरींनी केले आहे. तसेच यापूर्वी, सीमावाद पेटवायला दोन्ही राज्यातील भाजपचे सरकारच कारणीभूत. निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपुर्वक सिमावाद पेटवण्याचे दोन्ही राज्यातील सरकारकडून षडयंत्र, अशी टीकाही मिटकरींनी ट्विटरवरून केली होती. 

दरम्यान, प्रांतवाद चिघळला असून त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत, राज्य सरकारला हा वाद राजकारणासाठी चालू ठेवायचा आहे. सातत्याने हा वाद वाढला पाहिजे अशा पद्धतीने सीमावाद हातळला जात आहे, असा गंभीर आरोपही एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :border disputeसीमा वादAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस