शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटलांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मौन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 15:29 IST

२०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदारपूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या वाटेवर असल्याचा इशारा दिला आहे. परंतु, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाही. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी संदर्भात अनेक गौप्यस्फोट केले. परंतु त्यावर राष्ट्रवादीकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला बारामती मतदार संघातून निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. परंतु, आपण राष्ट्रवादीला शब्द दिल्याचे त्यांना सांगितले. तसेच सुप्रिया सुळे यांना मदत करण्यासाठी राहुल गांधी यांनी आपल्याला सांगितले होते. तर शरद पवारांनी इंदापूरविषयी निश्चित राहा असंही सांगितले होते. मात्र आता त्यांनी शब्द पाळला नाही. त्यामुळे आपण आपली भूमिका १० सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. इंदापूरची जागा सोडायची होती, तर मग शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये का आणली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी तब्बल साडेचार वर्षांनी अजित पवार यांचा आपल्याला फोन आला होता, असा खुलासा करताना वाघ म्हटलं तरी चावत आणि वाघोबा म्हटल चावतं, असा टोलाही पाटील यांनी लगावला होता. पाटील यांच्या फटकेबाजीमुळे राष्ट्रवादीचं एकांगी राजकारण समोर आले आहे.

या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया येणे अपेक्षीत होते. परंतु, अद्याप राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यांने यावर प्रतिक्रिया दिली नाही. २०१४ मध्ये स्वतंत्र लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे काही मतदारसंघ एक्सचेंज झाले आहे. इंदापूरमधून दत्तात्रय भरणे विजयी झाले. तर हर्षवर्धन यांचा पराभव झाला. परंतु, २०१९ मध्ये आघाडी होईल आणि इंदापूर मतदारसंघ पुन्हा काँग्रेसला मिळेल या आशेने पाटील काम करत होते. परंतु, राष्ट्रवादी आग्रही असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आक्रमक आहेत. तसेच पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत केली होती. त्या मदतीची राष्ट्रवादीकडून परतफेड होईल अशी अपेक्षा पाटील यांना होती.