शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा फडणवीस साहेब वेडेवाकडे जन्माला आले असते: रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 17:40 IST

मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली असून आज ही यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आघाडी सरकारने काय केले म्हणणाऱ्या फडणवीस यांना आमच्या सरकारने पोलियो डोस पाजले नसते तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. असा खोचक टोला चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

चाकणकर पुढे म्हणाल्यात की, मुख्यमंत्री यांच्या महाजनादेश यात्रेचे काळे झेंडे दाखवून स्वागत होत आहे. फडणवीस सरकारच पाच वर्षात पापाचा घडा एवढा भरला आहे,की त्यांना जनते समोर जाताना भीती वाटत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गेल्या ७० वर्षात काय केलं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जर आघाडीच्या सरकारने पोलिओचा डोस दिला नसता, तर ते वेडेवाकडे जन्माला आले असते. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली.

राज्यात महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. राज्यातील सर्वात अपयशी गृहमंत्री म्हणून फडणवीस ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. लोकांमध्ये जायला मुख्यमंत्र्यांना भीती वाटते. त्यामुळे ते आपल्या यात्रा पोलीस बंदोबस्तात काढत असल्याचा आरोप सुद्धा चाकणकर यांनी यावेळी केला.