शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule : "ज्यांनी काही केलं नाही असे आमचे दोन नेते आज तुरुंगात," सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:02 IST

NCP Leader Supriya Sule commented on Nawab Malik Anil Deshmukh ed raid in jail will ask Narendra Modi and Amit Shah"जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा" - सुप्रिया सुळे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे NCP Leader Supriya Sule  यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “आमचे दोन नेते, ज्यांनी काहीही केलं नाही ते सध्या तुरुंगात आहेत. आज नाही तर उद्या आम्हाला न्यायालयाकडून न्याय मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. माझं हे बोलणं रेकॉर्ड करून ठेवा. जेव्हा ते दोघं जण बाहेर येतील आणि त्यांना क्लिन चीट मिळेल, तेव्हा माझं हे रकॉर्डिंग नक्की दाखवा,” असं सुळे म्हणाल्या.

“दोन्ही केसेस मध्ये काय होतंय हे मला माहित आहे. कशाप्रकारे जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. तुम्ही डेटा काढून पाहा, जे केंद्राविरोधात बोलतायत त्यांच्यावरच धाड टाकली जात आहे. त्यांचा जागतिक विक्रम आहे. त्यांनी १०९ वेळा देशमुख कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली आहे. १०८ वेळा धाड टाकताना काय केलं? १०९ व्यांदा धाड टाकावी लागली कारण त्यांना १०८ वेळा काहीच मिळालं नाही.” असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. “हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. ज्या व्यक्तीवर सर्व व्यक्तीवर आरोप आहेत, तोच आच माफीचा साक्षीदार होतोय, हे दुसरं आश्चर्य आहे. ज्यांनी स्वत: कबुल केलंय तो आज माफीचा साक्षीदार कसा बनू शकतो, हा कोणता न्याय आहे. मोदीजी तुम्ही हा कोणता न्याय करताय असं मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना संसदेत विचारणार आहे. मी मोदीजींपासून नाराज नाही पण नक्कीच आश्चर्य वाटतंय की हे काय होतंय?,” असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेAnil Deshmukhअनिल देशमुखnawab malikनवाब मलिक