शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Sharad Pawar : ... पण त्यांनी विक्रम केला हे मान्य करायला हवं; अनिल देशमुखांच्या घरावरील छाप्यांवरून पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 15:33 IST

Sharad Pawar On Anil Deshmukh House Raid : अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं पाचव्यादा छापा टाकला. कथित १०० कोटींच्या वसूली प्रकरणी सध्या तपास आहे सुरू.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयनं पाचव्यादा छापा टाकला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या आरोप केले होते. कथिर शंभर कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणी सध्या सीबीआयकडून (CBI) तपास सुरू आहे. तपासादरम्यान सीबीआयनं पाच वेळा देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवा यांनी जोरदार टोला लगावला आहे. मुंबई आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. 

"काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्यानं केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांसारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं सध्या चित्र दिसत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला होता. परंतु ज्यांनी ते आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा ‌पत्ता लागत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करतो असं चित्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं," असं पवार यावेळी म्हणाले. अनिल देशमुख यांच्या घरी आता पाचव्यांदा छापा टाकण्यात आला असून पाच वेळा छापा हा सीबीआयचा विक्रम असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

अनिल देशमुख यांची सध्या चौकशी सुरू आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकण्यात आला. या एजन्सीचं मला कौतुक वाटतं.  परंतु एकाच घरात पाच वेळा चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनं करावा असंही ते म्हणाले.

लखीमपूरसारखी घटना यापूर्वी घडली नाही"लाखीमपूर खेरी याठिकाणी जो हिंसाचार झाला तो पूर्वी कधी झाला नव्हता. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा होता ही गोष्ट आधी नाकारली गेली. परंतु न्यायालयानं दखल घेतल्यानंतर त्याला अटक करावी लागली. यात सत्ताधारी पक्ष भाजपनं भूमिका घ्यायला हवी होती. परंतु त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली गेली. शेतकऱ्यांची हत्या झाली आहे, त्या घटनेत एक पत्रकार सुद्दा मृत्यू पावले आहेत हे मला एका वृत्तपत्रातून समजलं आहे," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.लखीमपूरच्या मुद्द्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी मावळमध्ये काय घडलं असं विचारलं. त्यांनी जे काही विचारलं ते बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले. परंतु त्यांच्या मृत्यूला नेते जबाबदार नव्हते. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काही पाऊल उचललं होतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मावळमधल्या शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतरप लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखSharad Pawarशरद पवारCBIगुन्हा अन्वेषण विभागParam Bir Singhपरम बीर सिंग