शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी,’ PhonePe च्या निर्णयानंतर रोहित पवारांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:28 IST

वेदांता फॉक्सकॉननंतर आता फोन पे नं आपलं कार्यालय महाराष्ट्राबाहेर हलवण्याचा निर्णय घेतलाय.

महाराष्ट्रात येणारा वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला यावरून राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. अशातच आता आणखी धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. आता PhonePe या दिग्गज कंपनीनं महाराष्ट्राबाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीनं एका जाहिरातीद्वारे दिली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

‘फोन पे डेबिटेड फ्रॉम महाराष्ट्र, क्रेडिटेड टू कर्नाटक. वेदांतानंतर #PhonePe ची बारी. गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, वा रे सत्ताधारी. टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक पे, महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा वे,’ असं म्हणत रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीकेचा बाण सोडला.कायआहेप्रकरण?फोन पे नं एका वृत्तपत्रात दिलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये आपलं मुंबईतील कार्यालय कर्नाटकात स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचं म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच वेदांता-फॉक्सकॉननं आपला प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केली होती. परंतु यापूर्वी तो महाराष्ट्रात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. परंतु कंपनीनं गुजरातची निवड केली.

कायम्हटलंफोनपेनं?“कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयल महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात बदलण्यासाठी कंपनी कायदा २०१२ च्या कलम १३ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्यात आलसा आहे. ज्यासाठी कंपनी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये फेरफार करण्यासंदर्भात १६ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या आमसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे,” असं कंपनीनं दिलेल्या नोटीसीमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय