शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'लेडी डॉन'वरून खडाजंगी; नवाब मलिक यांचा ‘एनसीबी’वर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 6:09 AM

समीर वानखेडेंची बहीण अन् फ्लेचर पटेल यांचेही प्रत्युत्तर

मुंबई : एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन यांच्या फोटोसह ट्वीट करीत  त्यांना ‘माय सिस्टर, लेडी डॉन’, असे संबोधणारे फ्लेचर पटेल यांच्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. फ्लेचर पटेल यांच्यासोबत फोटोत असलेली लेडी डॉन कोण आहे, या लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय, तिचे बॉलिवूडशी काय कनेक्शन आहे, असे सवाल मलिक यांनी समीर वानखेडे यांना केले आहेत. त्यावर यास्मिन पटेल यांनी उत्तर दिले आहे.  माझा भाऊ चांगले काम करीत आहे. मी मनसे चित्रपट सेनेची उपाध्यक्ष आहे, वकिली करते. उगाच निराधार आरोप करू नका. पुरावे द्या आणि मग बोला, असे आव्हान यास्मिन यांनी नवाब मलिक यांना दिले आहे. नवाब मलिक यांनी भविष्यात असेच आरोप केले तर आपण त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, कायदेशीर नोटीस तर पाठविणार आहेच, असे यास्मिन म्हणाल्या. ही लेडी डॉन बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करीत आहे का?  तसेच, फ्लेचर पटेल त्यांच्या सोशल मीडियावर वानखेडेंच्या कुटुंबीयांसोबत फोटो टाकत आहेत. ‘माय सिस्टर लेडी डॉन’ अशा उल्लेखासह टॅग करीत आहेत. त्यामुळे वानखेडेंचा या फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? एनसीबीच्या तीन केसेसमध्ये पटेलच पंच कसे झाले? हे त्यांनी सांगावे, असेही मलिक म्हणाले.तरुणांना व्यसनांपासून दूर करण्यासाठी मदतफ्लेचर पटेल यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले, ‘मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठे आणि चांगलं काम करीत आहेत. सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून एनसीबीला मदत करीत असतो. देशात अमली पदार्थ आणून तरुण पिढीला व्यसनी केले जात आहे.  ते रोखण्याचे काम एनसीबी करीत आहे, असे फ्लेचर पटेल यांनी सांगितले. वानखेडे म्हणतात ‘माझ्या शुभेच्छा, सत्यमेव जयते’मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मात्र मौन बाळगणे पसंत केले आहे. शनिवारी मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपाबद्दल त्यांना ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ या मोजक्या शब्दांत समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देत अधिक भाष्य करणे टाळले. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो