शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Nawab Malik Vs. Devendra Fadnavis Live: "जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछूट आरोप करत सुटलेत; आर्यन, शाहरुखला आणताहेत अडचणीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 13:56 IST

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून भाजप व राष्ट्रवादी यांच्यात आरोपांचे बॉम्ब फुटत आहेत. नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या ...

10 Nov, 21 03:48 PM

"रियाज भाटी फरार झालाय की त्याला पोलीस कस्टडीपासून वाचवलं जातंय?"

10 Nov, 21 03:24 PM

देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यासाठी मलिक यांच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत. म्हणून ते माझ्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करत आहेत. माझ्या विरोधात असलेल्या राजकीय गुन्ह्यांना नवाब मलिक गुन्हेगारी जगताशी जोडून मला गुंड म्हणत आहेत - मुन्ना यादव

10 Nov, 21 03:16 PM

नवाब मलिक यांच्यासारखे माझे कुठल्याही अंडरवर्ल्ड किंवा दहशतवाद्यांशी संबंध नाहीत - मुन्ना यादव 

10 Nov, 21 03:03 PM

पुण्यात भाजपाने नवाब मलिक यांचा पुतळा जाळला

10 Nov, 21 02:31 PM

रियाज भाटी फरार असल्याचं मलिकांनी सांगितले, सचिन वाझे प्रकरणाशी रियाज भाटीचं कनेक्शन?

10 Nov, 21 01:54 PM

"२००५ साली मलिकांनी व्यवहार कसा काय केला?"

मलिक हास्यास्पद आरोप आणि फोटोबाजी करत असून असे एक ना हजार फोटो आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे मूळ मुद्द्यापासून मलिकांनी पळ काढू नये. मुंबई बॉम्बस्फोटात ज्याचा हात होता आणि सध्या तो तुरुंगात आहे. अशा शाहवली खान याच्यासोबत २००५ साली मलिकांनी व्यवहार कसा काय केला? हाच मुख्य प्रश्न आहे. त्याचं मलिकांनी उत्तर द्यावं. विषयाला भरकटवण्याचं काम करु नये. जनता सुज्ञ आहे - आशिष शेलार

10 Nov, 21 01:42 PM

"जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछूट आरोप करत सुटलेत"

जावयावरील प्रेमापोटी नवाब मलिक बेछूट आरोप करत सुटलेत. यात आर्यन खान आणि आता शाहरुख खानला देखील तेच अडचणीत आणत आहेत. इतकंच नव्हे, तर मंत्री अस्लम शेख यांना अडचणीत आणण्याचं काम देखील मलिक यांनीच केलं आहे - आशिष शेलार

10 Nov, 21 01:36 PM

"मंत्रीच अल्पसंख्याक समाजाला नेस्तनाभूत करण्याचं काम करतोय का?"

नवाब मलिक अल्पसंख्याक लोकांना वेचून वेचून त्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत का? राज्याचा अल्पसंख्याक मंत्रीच अल्पसंख्याक समाजाला नेस्तनाभूत करण्याचं काम करतोय का? याचं आत्मपरिक्षण त्यांनी करायला हवं - आशिष शेलार

10 Nov, 21 12:44 PM

नितेश राणेंचा नवाब मलिकांना टोला, म्हणाले...

10 Nov, 21 12:41 PM

नितेश राणेंनी विचारला सवाल 

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये रियाझ भाटीचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आणि विचारले की, नवाबभाई म्हणतात की, रियाझ भाटी हा दाऊदचा माणूस आहे. पण त्यांना म्हणायचे काय आहे, असा सवाल नवाब मलिक यांना नितेश राणेंनी विचारला.

10 Nov, 21 12:39 PM

रियाझ भाटीचे थेट शरद पवार, उद्धव ठाकरेंसोबत फोटो शेअर करत नितेश राणेंचा नवाब मलिकांना टोला

10 Nov, 21 12:38 PM

"राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून रियाज भाटी पक्षाचं काम करत होता"

10 Nov, 21 12:33 PM

रियाज भाटी हा भाजपाशी नव्हे तर राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचा दावा

10 Nov, 21 12:30 PM

दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप असलेला रियाज भाटी हा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी - केशव उपाध्ये

10 Nov, 21 12:13 PM

नवाब मलिकांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

10 Nov, 21 12:03 PM

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला आणि फोडलेल्या हायड्रोजन बॉम्बला फडणवीसांनी एका ट्विटने उत्तर दिलंय. त्यामध्ये, डुकराचा उल्लेख केला असून डुकराशी कुस्ती खेळू नये, असं म्हटलं आहे.

10 Nov, 21 11:06 AM

"वांद्रे, वरळी इथं २०० कोटींचा फ्लॅट कुणाचा?"

तुमचीही काळी संपत्ती मी वेळ आल्यावर काढणार आहे. वांद्रे, वरळी इथं २०० कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे. बीकेसीतील फ्लॅट कोणाला राहायला दिला आहे. बेनामी संपत्तीबाबत तपास करायचा असेल तर मी कागदपत्रे द्यायला तयार आहे याबाबत आगामी काळात सांगेन असा इशारा मलिकांनी अमृता फडणवीसांना दिला आहे.

10 Nov, 21 10:59 AM

"दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा?"

10 Nov, 21 10:39 AM

देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा, मोदींपर्यंत कसा पोहोचला?- नवाब मलिक

10 Nov, 21 10:38 AM

पंतप्रधान आले असताना रियाझ भाटीने त्यांच्यासोबतही फोटो काढले - नवाब मलिक

10 Nov, 21 10:36 AM

आर्यन खानला कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आलंय़ - नवाब मलिक
 

10 Nov, 21 10:33 AM

बनावट नोटांचा तपास एएनआयकडे का नाही दिला? - नवाब मलिक
 

10 Nov, 21 10:33 AM

देवेंद्र फडणवीसांचे आणखी काळे धंदे जनते समोर आणणार - नवाब मलिक
 

10 Nov, 21 10:29 AM

गुन्हेगारांना वाचवण्यासाठी फडणवीसांनी समीर वानखेडेंची मदत घेतली - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:24 AM

रियाज भाटीच्या मदतीने फडणवीसांनी वसुलीचं रॅकेट चालवलं - नवाब मलिक

10 Nov, 21 10:21 AM

बनावट पासपोर्टप्रकरणी रियाज भाटीला २०१५ मध्ये अटक मात्र सध्या फरार - नवाब मलिक
 

10 Nov, 21 10:20 AM

१४ कोटींचं नोटांचं प्रकरण फडणवीसांनी दाबण्याचा प्रयत्न केला - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:18 AM

बनावट नोटाचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन - नवाब मलिक

10 Nov, 21 10:15 AM

१४ कोटींच्या बनावट नोटा जप्त, प्रत्यक्षात ८ लाख ८० हजार दाखवले - नवाब मलिक

10 Nov, 21 10:14 AM

फडणवीसांच्या आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:12 AM

नोटबंदीवरून नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
 

10 Nov, 21 10:08 AM

हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीस यांनी बांधकाम कामगार मंडळाचं अध्यक्ष बनवलं - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:07 AM

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंडाना मोठ्या पदावर बसवलं - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:04 AM

फडणवीस आणि NCB अधिकाऱ्यांचे चांगले संबंध आहेत. म्हणूनच NCB च्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 10:02 AM

देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केले, कालच त्याला उत्तर दिलं आहे - नवाब मलिक 
 

10 Nov, 21 09:45 AM

"त्यांची झोप उडाली आहे, आता शांतता गमावण्याची वेळ आली आहे"

10 Nov, 21 09:44 AM

नवाब मलिक 10 वाजता पत्रकार परिषद घेणार

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत आता नवाब मलिक पुन्हा एकदा माध्यमांसमोर येणार. आज सकाळी 10 वाजता नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार

टॅग्स :Politicsराजकारणnawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा