शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या मनात काय हे घरचे सांगू शकत नाही तर...; जितेंद्र आव्हाडांचा चंद्रशेखर बावनकुळेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:13 IST

आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मुंबई - चंद्रशेखर बावनकुळे यांना बंड होणार हेसुद्धा माहिती नव्हती. ज्यांना साधी जागा मिळाली नाही त्यांना इतक्या गुप्त गोष्टी माहिती पडतील का? शरद पवारांच्या मनात काय याचे आकलन बावनकुळेंना कसं लागेल. पवारांच्या मनात काय हे त्यांच्या घरचे सांगू शकत नाही तर बावनकुळे काय सांगणार अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्यावर टोला लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री बनायचे होते हे बावनकुळेंना माहिती नव्हते. मी पहिला साक्षीदार आहे, शिंदेंनी मला काय सांगितले ते स्वत: नाकारू शकत नाहीत. हे सरकार बनलेही नव्हते त्याआधीपासून शिंदेंच्या मनात मुख्यमंत्री बनण्याचं होते. बावनकुळे हवेत बोलत आहेत. शरद पवारांच्या मनात असे काहीच नव्हते असं त्यांनी सांगितले. 

तसेच सामान्य शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. लोकांचा प्रतिसाद आपल्याला मिळत नाहीत, हेच बोलणे मंत्रालयात येते. कसंही करून लोकांच्या मनात टाका, सत्ता हीच आहे हे पटवून द्या, त्यामुळे जमावाजमव करण्याची सुरूवात होते. ७७-८० च्या दशकात इंदिरा गांधी यांना सगळे सोडून गेले होते. आमदार सोडून गेल्याने काही होत नाही. जनतेच्या हातात सर्वकाही असते. जुने सोडून गेल्याने पक्षात नवीन पोरांना संधी मिळते त्यात वाईट नाही असं त्यांनी सांगितले. तसेच गद्दार दिन लोकांच्या घराघरात गेलाय, ५० म्हटलं तरी लोकं पुढे बोलतात खोके, २० जून खोक्यांचा दिवस, गद्दार दिवस आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तो महाराष्ट्रातल्या घराघरात साजरा केला जाणार आहे. 

काय म्हणाले होते बावनकुळे?तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ चा एक फॉर्म्युला तयार केला होता. त्यात सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होतील असे ठरविण्यात आले होते. जेव्हा याची कुणकुण शिवसेनेच्या आमदारांना लागली तेव्हा त्यापैकी ४० आमदारांनी बंड पुकारले व मविआचे सरकार कोसळले असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदे