शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar : “आभाळागत माया तुझी..,” शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर आव्हाडांचं भावनिक ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:39 IST

आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.

आज महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यावेळी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. 

दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट करून दिली. सुख थोडं, दुःख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊं दे, आभाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊं दे,” असं ट्वीट त्यांनी केलंय. “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेली ६० वर्षे कार्यकर्त्याच्या मनात काय, हे बघणारे जादूगर आहात. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला,” असंही ते म्हणाले होते.

“तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. आमचं जीवनच तुम्ही आहात. एवढ्या अडचणी असताना कोणाकडं जायचं?,” असं म्हणत जितेंद्र आव्हाडांना अश्रू अनावर झाले होते.

काय म्हणाले पवार?“प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ६० वर्षांत महाराष्ट्रानं व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिलं, हे मी विसरू शकत नाही. पण, यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणं आवश्यक वाटतं. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी असे मी सुचवू इच्छितो,” असं शरद पवारांनी नमूद केलं.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवार