शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

NCP नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जाणार?; अमित शाह यांच्यासोबत फोनवरून चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 08:50 IST

एकनाथ खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. परंतु व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नाही

जळगाव - भाजपामधील अंतर्गत वादाला कंटाळून पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच खडसे अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते परंतु शाह यांच्याशी भेट झाली नाही मात्र फोनवरून दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. 

याबाबत भाजपा खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे आणि मी अमित शाह यांच्या भेटीसाठी गेलो होतो परंतु शाह त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेटू शकले नाहीत. मात्र फोनवरून चर्चा झाली आहे. चर्चा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामुळे मी त्यावर बोलू इच्छित नाही. ज्यांना राजकारण करायचं असेल ते करणारच आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपात येणार आहेत असं मला माहिती नाही. मी भाजपात आहे आणि नाथाभाऊ राष्ट्रवादीत आहेत असं त्यांनी सांगितले. 

भाजपा प्रवेशाचं एकनाथ खडसेंकडून खंडनपंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शाह यांना भेटू नये हे नियम आहेत का? मोदी-शाह यांच्यासोबत विरोधक गोधडीत असल्यापासून माझे संबंध आहेत. मी अमित शाह यांना याआधीही भेटलो. यापुढेही भेटणार आहे. देवेंद्र फडणवीसांनाही भेटणार आहे. म्हणून त्याचा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही असं सांगत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चेचं खंडन केले आहे. 

कोण आहेत एकनाथ खडसे? एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत. १ वर्षापूर्वी खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. विरोधी पक्षनेतेपदापासून महसूल मंत्री असा त्यांना प्रवास आहे. मुख्यमंत्रिपदापासाठी एकनाथ खडसेंचे नाव चर्चेत होते. परंतु ऐनवेळी भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना संधी दिली. त्यानंतर हळूहळू एकनाथ खडसेंचे वर्चस्व पक्षात कमी होऊ लागलं. देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे खडसेंनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.  

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेAmit Shahअमित शाहBJPभाजपा