शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा यांनी लकडावालाकडून ८० लाख घेतले याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 16:39 IST

नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

“नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला या दाऊदच्या माणसाकडून ८० लाख रुपये घेतल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचा तपास मुंबई पोलिसांनी व ईडीनेही करावा,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी यासंदर्भातील मागणी केली. “मंत्री नवाब मलिक यांनी ५ लाखाचा जमीन व्यवहार केला त्याच्यावर ईडीने कारवाई केली. ते दाऊदच्या माणसाकडून खरेदी केली असं म्हणतात परंतु ते कुठेही काही दिसत नाही. मात्र नवनीत राणा यांनी सरळसरळ ८० लाख रुपये घेतले आहेत. याची कागदपत्रे खासदार संजय राऊत यांनी दिली आहेत,” असेही छगन भुजबळ म्हणाले.

“नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपये घेतले ते कशासाठी घेतले, कुणाच्यावतीने घेतले याचीही मुंबई पोलिसांनी व बाकीच्या यंत्रणांनीही चौकशी करायला हवी,” असेही छगन भुजबळ म्हणाले. नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत याबाबत हायकोर्टाने नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या मागासवर्गीय नाहीत असं हायकोर्ट बोलत आहे. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले आहे. मूळात त्या मागासवर्गीय आहेत का हे प्रश्नचिन्ह आहे असेही छगन भुजबळ म्हणाले. 

काय अन्याय केला?नवनीत राणा आमच्यावर अन्याय केला असं बोलत आहेत. काय अन्याय केला असा सवाल करतानाच तुम्ही दिवसभर काय करत होतात हे सर्वांनी पाहिले आहे असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. पोलीस ठाण्यात अन्याय झाला म्हणतात मग पोलिसांविरुद्ध त्यांची तक्रार नाही असे पोलीस रेकॉर्ड मध्ये नमूद असल्याचे पत्र छगन भुजबळ यांनी दाखवतानाच मग यांच्यावर अन्याय काय झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाChhagan Bhujbalछगन भुजबळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय