पोलिसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक

By Admin | Updated: October 20, 2016 13:18 IST2016-10-20T13:18:51+5:302016-10-20T13:18:51+5:30

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडद काळ्या फिल्मीगच्या संशयास्पद मोटारीची चौकशी करायला गेलेल्या गस्तीवरील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.

NCP leader arrested for rioting | पोलिसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक

पोलिसाला मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक

>ऑनलाइन लोकमत
वाकड (पुणे), दि. २० -  अलीकडच्या काळात पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यात प्रचंड वाढ झाली असतानाच हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडद काळ्या फिल्मीगच्या संशयास्पद मोटारीची चौकशी करायला गेलेल्या गस्तीवरील दोघा पोलिस कर्मचाऱ्यांना सात ते आठ जणांच्या टोळक्याने प्रचंड मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार काल रात्री आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी बाणेर मधील एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासह अन्य सहा जणांवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचजन अटक तर दोघे आरोपी फरार आहेत. 
 
हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी रात्री आठच्या सुमारास पेट्रो ३ या वाहनातून पोलीस शिपाई धुमाळ व नितीन खोपकर हे दोघे गस्त घालत असताना सुस फाटा येथे रस्त्याच्या कडेला अंधारात गडद काळया काचा लावलेली कार बराच बेळ थांबल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली त्यामुळे त्यांनी वाहनाजवळ जाऊन चौकशी करीत येतघे लूटमार होते येथे थांबू नका असे म्हणाल्याने आरोपीने अश्लील भाषेत उत्तर दिले त्यावरून त्यांच्यात बाचाबाची सुरु होताच आरोपीने अन्य सात ते आठ जणांना फोन करून बोलावून घेतले लागलीच गणपत मुरकुटे यांच्यासह अन्य सात जण तेथे दाखल होत शिवीगाळ करीत सर्वानी मिळून धुमाळ व खोपकर यांना मारहाण करीत शिवीगाळ केली यामध्ये धुमाळ गंभीर जखमी झाले आहेत.  
 
याप्रकरणी हनुमंत धुमाळ (वय. ३०) या कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे त्यानुसार राष्ट्रवादीचे गणपत मुकुंदराव मुरकुटे (वय. ५३, रा. माऊली बंगला, डीपीरोड बाणेर) याच्यासह कौस्तुभ देविदास मुरकुटे (वय. १९, रा. पारखी मळा, बाणेर), आकाश तुकाराम विधाते (वय. २१), अभिजित चंद्रकांत विधाते (वय. २०, रा. दोघेही. रा. विधाते वस्ती, बाणेर), लक्ष्मण बाबासाहेब तांगडे (वय. २४, रा. माऊलीकृपा पंपाशेजारी, बाणेर), विनोद ज्ञानेश्वर मुरकुटे (वय. २४, रा. माऊली बंगला, डीपीरोड बाणेर) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही  रात्र अधिकारी सहायक निरीक्षक पवन पाटील यांनी मध्यरात्रीपर्यंत याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. 
 
गुन्हा दाखल होऊ नये म्हणून राजकीय दबाव 
गणपत मुरकुटे हे बाणेर मधील प्रतिष्टीत अन राष्ट्रवादीचे मोठे राजकीय नाव असून मुरकुटे स्वतः मोठे उद्योजक असल्याने सबंध असलेल्या अनेक राजकीय पुढ्याऱ्यांचा-नेत्यांचे मुरकुटे यांना वाचविण्यासाठी गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर मोठा दबाव होता. अनेक राजकीय पुढ्याऱ्यांचे ठाण्यात फोन खणखणून गेले अगदी फिर्यादी कर्मचाऱ्याचीदेखील बोळवण करण्यात आली. मात्र तो कर्मचारी निर्णयावर ठाम असल्याने रात्री साडे बाराच्या सुमारास पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला. 

Web Title: NCP leader arrested for rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.